Tuesday, November 6, 2012

आयुष्यात कधीतरी केव्हातरी...

आयुष्यात  कधीतरी  केव्हातरी,
थोडं वेड्यासारखं वागावे..

फुलासारखे  फुलावे,
केव्हातरी  कोमजाय्चेच  आहे…

घोड्यासारखे  तुफानी  पाळावे,
कधीतरी  कासवासारखे  चालायचेच  आहे...

मोठे  होऊनही,
लहानांसारखं  निरागस  बागडावे ,
केव्हातरी  जबाबदार्या ,कर्तव्य  पार  पडायचेच  आहेत…

रोजच्या  कामातून  एक  दिवस  कुणालाच  न  सांगता,
मजेत  फिरावं, हवं ते करावं,
कधीतरी  आयुष्यात  गुंतायचेच  आहे…

कधीतरी  मित्रांबरोबर  टवाळक्या  करत,
मस्तं कट्यावर  बसावे,पिक्चर बागवे,मस्ती  करावी,
केव्हातरी  सिरीयस  बनायचेच  आहे…

आयुष्यात  एकदातरी  प्रेमात  पडावे,
कधीतरी  लग्नं करून   संसार  थाटायचाच  आहे..

असच  सगळ्यांना  हसवत  आणि  स्वतः  हसत  आयुष्य  जगावे,
कधीतरी  केव्हातरी  मरायचेच  आहे …..
कधीतरी  केव्हातरी  जग  सोडायचेच  आहे …
कधीतरी केव्हातरी सर्वांना निरोप देयचाच आहे..

- स्नेहल वेताळ 

सर सर , सर सर येई सरी..

सर  सरसर  सर  येई सरी 
चिव  चिवचिव  चिव  करे  चिमणी 

होई  सारी  सृष्टी  खुश,
रान  होई हिरवेगार,
कोमल  फुले  फुली  अंगणात,
फुलांचामातीचा  सुहास  सगळीकडे  दर्वळी  …
सर  सर  येई  सरी..

सर  सर  सरी,
देई  एक  धडा ..
कडकडत्या  उन्हा  नंतर 
या  सरी  देई  एक  मस्त  शांत  निःश्वास ..
त्या  कडकडत्या  उन्हामुळे  कळे  आपल्यास  सरींचा  गारवा ..
तसेच  आयुष्याचा  दुःखानमुळे कळे  आपल्यास  सुखाचं  महत्व ..

ज्यास  नाही  अनुभवले  दुःख..
ज्याने  नाही  अनुभवले  दुखांमुळे  हृदयातून  रडणे,
त्यास  ठाव  नाही  खऱ्या सुखाचा ..
ठाव  नाही  त्यास,  एका  काळोख  दुःखानंतर  येणाऱ्या  सुखांच्या  अश्रूंचा  ..
ठाव  नाही  त्यास ऊन पावसाचा  हा  सुंदर  खेळ 

हा  खेळ  जो  करे  मनास  कठोर,
येईल  त्या  अडचणीस  सामोरे  जाण्यासाठी ..
आणि  हाच  खेळ  जो  या  भाबड्या  मनास  देई  एक  क्षण  एवढे  सुख ..
कि  ते  जाई सारे  अडचणी  विसरून,  घेई  आयुशाचा  आनंद 

आशा ह्या  सर  सर  सरी 
हव्या  हव्याश्या  वाटणाऱ्या  या  सरी ..
निसर्गाचे  रूप  खुलवी ..

सर  सर येई  सरी ..
चिव  चिव  करी  चिमणी ..

-- स्नेहल वेताळ