Tuesday, November 6, 2012

आयुष्यात कधीतरी केव्हातरी...

आयुष्यात  कधीतरी  केव्हातरी,
थोडं वेड्यासारखं वागावे..

फुलासारखे  फुलावे,
केव्हातरी  कोमजाय्चेच  आहे…

घोड्यासारखे  तुफानी  पाळावे,
कधीतरी  कासवासारखे  चालायचेच  आहे...

मोठे  होऊनही,
लहानांसारखं  निरागस  बागडावे ,
केव्हातरी  जबाबदार्या ,कर्तव्य  पार  पडायचेच  आहेत…

रोजच्या  कामातून  एक  दिवस  कुणालाच  न  सांगता,
मजेत  फिरावं, हवं ते करावं,
कधीतरी  आयुष्यात  गुंतायचेच  आहे…

कधीतरी  मित्रांबरोबर  टवाळक्या  करत,
मस्तं कट्यावर  बसावे,पिक्चर बागवे,मस्ती  करावी,
केव्हातरी  सिरीयस  बनायचेच  आहे…

आयुष्यात  एकदातरी  प्रेमात  पडावे,
कधीतरी  लग्नं करून   संसार  थाटायचाच  आहे..

असच  सगळ्यांना  हसवत  आणि  स्वतः  हसत  आयुष्य  जगावे,
कधीतरी  केव्हातरी  मरायचेच  आहे …..
कधीतरी  केव्हातरी  जग  सोडायचेच  आहे …
कधीतरी केव्हातरी सर्वांना निरोप देयचाच आहे..

- स्नेहल वेताळ 

No comments:

Post a Comment